हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले जगातील सर्वात शक्तीशाली ‘अपाचे हेलिकॉप्टर’


नवी दिल्ली : भारतीय हवाई सेनेच्या ताफ्यात आज अमेरिकी बनावटीचे ‘अपाचे हेलिकॉप्टर’ दाखल झाले आहे. हवाई सेना प्रमुखांच्या उपस्थितीत हा सोहळा मंगळवारी पठाणकोट वायू तळावर पार पडला. याबाबत 2015मध्ये अमेरिका आणि भारतात करार झाला होता. भारताला अशी एकूण 22 चॉपर्स मिळणार असल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकत आता वाढणार आहे. ‘मल्टी रोल कोंबट हेलिकॉप्टर’ असेही याला म्हणतात आणि या श्रेणीतील हे जगातील सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. अमेरिकन लष्कर आणि हवाई सेनाही याचा भरपूर वापर करतात.

जेव्हा जगातील सर्वात धोकादायक हल्ल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचा प्रश्न येतो तेव्हा अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे नाव सर्वात आधी घेतले जाते. आज हे शक्तिशाली हेलिकॉप्टर अधिकृतपणे भारतीय हवाई दलात सामील झाले आहे. पठाणकोट हवाई तळावर निवृत्ती घेण्यापूर्वी भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ हे भारतीय हवाई दलात जगातील सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टर सामील करणार आहेत.

तीन दशकांहून अधिक काळातील MI 35 हेलिकॉप्टरची जागा हल्ला करणारे हे हेलिकॉप्टर घेणार आहे. स्क्वॉडर्न ग्रुप कॅप्टन एम शयलूच्या यांच्याकडे पहिले अपाचे असणार आहे. यापूर्वी ते कार निकोबार येथील MI-17 V5 हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. अपाचे हेलिकॉप्टरवर ज्यांनी सखोल प्रशिक्षण घेतले आहे. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे शत्रूच्या घरात घुसण्याची भारताची क्षमता आणखी वाढली आहे.

Leave a Comment