असे आहे जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर ‘अपाचे’


भारतीय वायुदलाच्या पठाणकोट एअरबेसवर ‘अपाचे AH-64E’ हे आठ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हे जगातील सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टर असून, अमेरिकन सैन्यात देखील या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.डिजीटल कनेक्टिविटी आणि अत्याधुनिक सुचना प्रणालीमुळे हे हेलिकॉप्टर अधिक शक्तीशाली आहे. या हेलिकॉप्टरमधील तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागांमध्ये देखील कारवाई सहज शक्य आहे. अचूक मारक क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये बॉम्ब, गन आणि मिसाइल देखील सुसज्ज केली जाऊ शकते.

का आहे हे सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टर ?
अपाचे एएच-64ई हेलिकॉप्टर कोणत्याही वातावरणात, दिवस असो अथवा रात्र उड्डाण घेऊ शकते. यामधील तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याची शस्त्र लाँच करता येतात.

हे हेलिकॉप्टर रडार लेस आहे. ज्यामुळे लक्ष्याचा अचुक वेध घेता येतो. याचबरोबर एका मिनिटापेक्षा कमी वेळेत एकाच वेळी 128 टारगेटवर निशाणा साधता येतो.

या हेलिकॉप्टरची निर्मिती करणाऱ्या बोईंग कंपनीनुसार, यामध्ये अनेक प्रकारचे इंटिग्रेटेड सेंसर, नेटवर्किंग, डिजीटल कम्युनिकेशन्स सुचना, रियल टाइम कॉम्बँट एरिया मैनेजमेंट अशा अनेक गोष्टी आहेत.

हे हेलिकॉप्टर एअर-टू-एअर मिसाइलद्वारे क्षणात शत्रुचे चॉपर पाडू शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे एक मोस्ट एडवांस्ड कॉम्बँट हेलिकॉप्टर आहे.

हे हेलिकॉप्टर एकाच वेळी 256 मुविंग टारगेट्स डिटेक्ट करू शकते. यामध्ये ट्वीन इंजिनचा वापर करण्यात आला असून, 16 फूट उंच आणि 18 फूट रुंद असा आकार असलेले हेलिकॉप्टर दोन पायलट्स मिळून ऑपरेट करतात. तसेच हे हेलिकॉप्टर ताशी 280 किमी वेगाने उडू शकते. याचबरोबर 550 किमीची फ्लाईंग रेंज, 16 अँटी टँक मिसाईल सोडण्याची क्षमता देखील आहे. तसेच,यातील रायफलमधून एकाच वेळी 30 एमएनच्या 1200 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात व हेलिकॉप्टरमध्ये सलग 2.45 तास उडण्याची क्षमता देखील आहे.

Leave a Comment