क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका डावात 12 खेळाडूंनी केली फलंदाजी


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्यात हैराण करणारी गोष्ट घडली. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका डावामध्ये 12 फलंदाजांनी बँटिंग केल्याची घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे 12 खेळाडूंनी बँटिंग करून देखील या सामन्यात संघाला विजय मिळाला नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून 12 खेळाडूंनी बँटिंग केली. तुम्ही विचार करत असाल की, क्रिकेटमध्ये तर अकराच खेळाडू खेळतात मग 12 खेळाडूंनी बँटिंग केली कशी ? चला तर जाणून घेऊया.

वेस्ट इंडिजचा संघाचा खेळाडू डेरेन ब्रावोला बँटिंग करत असताना इशांत शर्माच्या ओव्हरमध्ये हेलमेटच्या मागे बॉल लागला. बॉल लागल्यानंतरही त्याने तिसऱ्या दिवशी बँटिंग केली. चौथ्या दिवशी ब्रावो मैदानात उतरल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ होऊ लागले. त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट करण्यात आले. त्याने 23 धावा केल्या होत्या. त्यानंतर अधिकृतरित्या सांगण्यात आले की, बाकीच्या मॅचमध्ये सब्सिट्यूट म्हणून जेर्मेन ब्लॅकवुड बॅटिंग करेल. ब्लॅकवूडने या सामन्यात 38 धावा केल्या.

नियम –

आयसीसीने काही दिवसांपुर्वीच नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार, जर एखाद्या खेळाडूच्या डोक्याला बॉल लागला व त्यामुळे त्याला अस्वस्थ अथवा चक्कर येण्यासारखे वाटत असेल तर, त्याच्या जागी 12 खेळाडूला खेळवले जाऊ शकते. मात्र तो खेळाडू त्याच्याप्रमाणेच (फलंदाज असेल तर फलंदाज, गोलंदाज असेल तर गोलंदाज) असणे आवश्यक आहे.

या 12 खेळाडूंनी केली बँटिंग – 

  1.  जॉन कॅपबेल – 16 धावा
  2. क्रेगल ब्रैथवेट – 3 धावा
  3. डेरेन ब्रावो – 23 धावा
  4. शामर्ह ब्रूक्स – 50 धावा
  5. रोस्टन चेस – 12 धावा
  6. शिमरोन हेटमायर – 1 धावा
  7. जेर्मेन ब्लॅकवुड – 38 धावा
  8. जेसन होल्डर – 39 धावा
  9. जहमर हेमिल्टन – 0 धावा
  10. रकीम कार्नवाल – 1 धावा
  11. केमार रोच – 5 धावा
  12. शेनन गेब्रियल – 0 धावा

Leave a Comment