हिरेव्यापाऱ्याच्या घरात ५०० कोटींचा हिरा गणेश विराजमान


सध्या देशात गणेशोत्सव साजरा केला जात असून गावोगावी, घरोघरी गणेशाच्या विविध आकाराच्या, विविध प्रकारच्या मूर्ती स्थापन केल्या गेल्या आहेत. यंदा इकोफ्रेडली गणेश मूर्तीना अनेकांनी प्राधान्य दिल्याचेही दिसून येत आहे. गुजराथची हिरेनगरी सुरत येथील हिरे व्यापारी राजूभाई पांडव यांनी घरात ५०० कोटी रुपये किंमत असलेल्या हिऱ्याच्या गणेशाची स्थापना केली असून ही प्रतिमा पाहण्यासाठी दूरवरून लोक गर्दी करू लागले आहेत.

राजूभाई या मूर्तीचा इतिहास सांगताना म्हणतात, २००५ मध्ये कच्चे हिरे खरेदी करत असताना एक गणेशाच्या आकार असलेला कच्चा हिरा त्यांना मिळाला. त्यात निरखून पाहिले असताना त्यांना उजव्या सोंडेची गणेश प्रतिमा दिसून आली. त्यांनी परिवाराच्या सहमतीने हा हिरा तेव्हा २९ हजाराला विकत घेऊन घरी आणला. ते या हिऱ्याची दरवर्षी घरीच पूजा करतात. १४ वर्षापूर्वी २९ हजाराला घेतलेल्या या अमोल हिरयाची किंमत आता तब्बल ५०० कोटींवर गेली आहे. राजूभाई त्यामुळे या मूर्तीविषयी आता उघड उघड बोलत नाहीत मात्र हा जगातल्या दुर्मिळ हिरयांपैकी एक असल्याची त्यांची खात्री आहे.

Leave a Comment