मातीची ही गणेशमूर्ती आहे १२०० वर्षे जुनी


आज देशभर गणेशोत्सव दणक्यात सुरू आहे व गेली काही वर्षे इको फ्रेंडली गणेश मूर्तींची चर्चाही सुरू आहे. गुजराथेतील मेहसाणा जिल्ह्यातील उंझा रोडवरील येठोर या गावी मात्र १२०० वर्षे जुनी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती आजही पुजली जात आहे. या प्राचीन मंदिरातील गणेश दर्शनासाठी दरदूरच्या भागातून भाविक आवर्जून येत असतात. येथेही दरवर्षी गणेशेात्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

मंदिराचे पुजारी सांगतात दर महिन्याच्या चतुर्थीला या गणेशमूर्ती वर गोमय व मातीचा लेप दिला जातो. त्यानंतर ती भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाते. हे मंदिर खूप प्राचीन आहे. पांडवानी ही मूर्ती पुजली होती असे सांगितले जाते. सोलंकी राजघराणे राज्यावर असताना हे मंदिर बांधले गेले. सोलंकी राजे या गणपतिचे भक्त होते असेही सांगतात.

Leave a Comment