मोदींची बालपणीची चहाटपरी पर्यटनस्थळ बनणार


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा त्यांचे बालपण कसे गेले हे सांगताना रेल्वेस्टेशनवर वडिलांसोबत ते चहा विक्री करत असत असा उल्लेख केला आहे. गुजराथ मधील वडनगर स्टेशनवर असलेली ही चहा टपरी आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे काम सुरु झाले आहे. केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी या चहा टपरीचे मूळ स्वरूप तसेच ठेवण्यासठी हे दुकान काचेत बंदिस्त करण्याचे आदेश दिले आहेत.

वास्तविक २०१७ मध्येच पर्यटन मंत्रालयाने वडनगर रेल्वेस्टेशन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातच्या मेहसाना जिल्हातील मोदींचे हे जन्मगाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी पर्यटन विभागाने व्यापक योजना आखली आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचार सभात मोदींनी त्यांच्या बालपणात वडील चहा या स्टेशनवर चहा विक्रीचा व्यवसाय करत असल्याच्या आठवणी सांगितल्या होत्या. २०१७ मध्ये पर्यटन मंत्रालय आणि पुरातत्व विभागाने या भागाचे सर्व्हेक्षण हाती घेतले होते.

Leave a Comment