बबिता फोगाट राजकीय आखाड्यात उतरणार


देशविदेशात दंगल गर्ल अशी ओळख असलेली कुस्तीगीर बबिता फोगाट आता राजकीय आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असून हरियाणाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत ती रिंगणात उतरेल असे समजते. बबिता कुस्ती प्रमाणे या क्षेत्रातही यशाची पताका फडकविण्यास उत्सुक असल्याचे संकेत तिनेच दिले आहेत.

हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खटटर यांच्या जनआशीर्वाद यात्रेत बबिता भिवानी आणि दादरी जिल्यात उपस्थित होती. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयानी दिलेल्या माहितीनुसार बबिताला विधानसभा निवडणुकीत उतरण्यास तयार राहण्यास सांगितले गेले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना बबिताने पार्टी सांगेल तेथून लढण्यास तयार असल्याचे सांगितले असून तिने शक्ती प्रदर्शनही केले.

Leave a Comment