चांद्रयान – २चे लँडर ऑर्बिटरपासून होणार वेगळे


बंगळूरू – चंद्राच्या पाचव्या व शेवटच्या कक्षेत चांद्रयान-२ ने रविवारी प्रवेश केला आहे. चांद्रयान-२च्या या यशस्वी प्रवेशानंतर लँडर ऑर्बिटरपासून वेगळा करण्याची तयारी सुरू केली आहे.

याबाबत माहिती देताना इस्रोकडून सांगण्यात आले की, चांद्रयानने योजनेनुसार पाचव्या कक्षेत (१ सप्टेंबर, २०१९) यशस्वीरीत्या प्रवेश केला आहे. ‘विक्रम’ लँडरला चांद्रयान-२ ऑर्बिटरपासून विभक्त करायचे आहे. आज दुपारी १२.४५ ते १.४५ वाजण्याच्या दरम्यान वेगळे करण्यात येणार आहे. विक्रम लँडर ७ सप्टेंबरला दुपारपर्यंत चंद्रावर यशस्वीपणे पोहोचेल.

Leave a Comment