बंगलोर येथील दोड्डा गणेश

dodda
आजपासून देशभरात १० दिवस गणेशोत्सवाची धूम सुरु राहील. भारतात हजारोंच्या संखेने गणेश मंदिरे आहेत त्यातील काही आवर्जून भेट द्यावी अशी आहेत. कर्नाटकची राजधानी बंगलोर येथे असलेले दोड्डा गणेश मंदिर त्यापैकीच एक आहे.

बंगलोरच्या बसवनगुडी भागात महानंदी मंदिर रोडवर हे मंदिर असून ते बरेच जुने आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती भव्य आहे. १८ फुट उंच आणि १६ फुट रुंदीची हि मूर्ती पाषाणातील आहे. कानडी भाषेत दोडा म्हणजे मोठा. मूर्तीच्या प्रचंड आकारावरून त्याला हे नाव पडले आहे. असे सांगतात कि केपे गौडा नावाच्या एका माणसाच्या नजरेला एक मोठा खडक पडला. त्याला त्यावर गणेशाची प्रतिमा दिसली तेव्हा त्याने या खडकावर गणेश मूर्ती कोरून घेतली. याच जागी मंदिर बांधले गेले. या गणेशाला शक्ती गणेश असेही नाव आहे. या गणपतीला क्रीम पेंट दिला गेला असून त्यावर सोनेरी सजावट आहे.
ganesh
या गणेशाला लोण्याचा लेप लावण्याची प्रथा असून काही महत्वाच्या सणांना हा लोणी लेप लावला जातो. त्यासाठी १०० किलो लोणी लागते. या मंदिरात भाविकांची वर्षभर गर्दी असते.

Leave a Comment