स्मार्ट इंडियातील कारचोर ही झाले स्मार्ट


कार चोरीस जाणे हा भारतात घडणारा नेहमीचा प्रकार. पण आता नवा भारत स्मार्ट होत असतानाच कारचोर सुद्धा स्मार्ट झाल्याचा अनुभव येत आहे. कारचोरांनी त्यांचा मोर्चा आता संपूर्ण कार चोरण्याऐवजी कारचा एक विशिष्ट भाग चोरण्याकडे वळविला आहे. त्यातही लग्झरी, महागड्या कार्स या चोरांचे लक्ष्य बनत असल्याचे दिसून येत आहे.

पॉश वस्तीत या चोऱ्यांचे प्रमाण मोठे असून हे चोर महागड्या कार्सचे लोगो चोरून नेत आहेत. हे लोगो काळ्या बाजारात काही हजारात विकले जातात. मर्सेडिज, ऑडी, बीएमडब्ल्यू, जग्वारसारख्या लग्झुरीअस कार्सचे ओरीजनल लोगोसाठी ७ ते ३० हजार किंमत आकारली जाते. लोगो चोर हेच लोगो काळ्या बाजारात ५० टक्के कमी किमतीत विकतात. लोगो चोरीमागे मिळणारी रक्कम कमी वाटली तरी अन्य फायदे जास्त आहेत.

मुळात आपल्या कारचा लोगो गायब झालाय हे मालकाच्या पटकन लक्षात येत नाही. मालक किंवा कारचे चालक प्रथम गाडीचे टायर आणि बॉडीकडे लक्ष देतात. लोगो नसेल तर अनेकदा ते काही दिवसांनी लक्षात येते. कधी कधी लोगो पडून गेला असावा असा तर्क केला जातो आणि त्यामुळे सहसा पोलिसात तक्रार दाखल केली जात नाही. त्यामुळे चोरांना पोलीस पकडतील हा धोका राहत नाही असे सांगितले जाते.

Leave a Comment