स्टीव्ह जॉब्सची सही असलेल्या चित्रपटपोस्टरला २२ लाखाची किंमत


अॅपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची सही असलेले टॉय स्टोरी चित्रपटाचे एक दुर्मिळ पोस्टर नुकतेच लिलावात २२ लाख ४० हजार रुपयांना विकले गेले. लॉस एंजेलिस नेटे डी सेन्दर्सने वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. या पोस्टरसाठी सुरवातीची बोली २५ हजार डॉलर्स लागली आणि ती ३१२५० डॉलर्सवर थांबली.

मिळालेल्या माहितीनुसार स्टीव जॉब्स पिक्सर स्टुडीओचा अध्यक्ष व प्रमुख शेअर होल्डर होता. १९९५ मध्ये टॉय स्टोरी हा अॅनिमेटेड चित्रपट प्रदर्शित झाला तो या स्टुडीओचा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट खूपच हिट ठरला. या चित्रपटाचे हे २६ बाय ३६ साईजचे पोस्टर अगदी सर्वसामान्य आहे. पण त्यावर स्टीव्ह जॉब्स यांनी काळ्या मार्कर पेनने त्यांची सही केली होती त्यामुळे ते खास पोस्टर श्रेणीत आले होते.

Leave a Comment