बेअर ग्रील्सला मधमाश्यांनी दिला प्रसाद


डिस्कव्हरी चॅनल वरच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड शोचा हिरो, ब्रिटीश साहसी वीर आणि माजी सैन्य अधिकारी बेअर ग्रील्स याला शुटींग सुरु असताना मधमाश्यांच्या चाव्याना सामोरे जाण्याची वेळ आली आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला असल्याचे समजते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

द डेली स्टारने दिलेल्या रिपोर्टनुसार ४५ वर्षीय बेअर ग्रील्स पॅसिफिक समुद्रातील एका एकांत बेटावर त्याच्या आगामी ट्रेझर आयलंड या शोचे शुटींग करत असताना त्याला अचानक मधमाश्या चावल्या. सुरवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष करून शुटींग तसेच सुरु ठेवले पण थोड्याच वेळात त्याला या चाव्यांची अॅलर्जी आली आणि त्याची तब्येत एकदम गंभीर बनली. या वेळी बेअर्स नावेत होता. अखेर डॉक्टरनी नावेत चढून त्याच्यावर एपिपेन उपचार केले. डॉक्टर म्हणाले बेअरची हालत खराब झाली होती आणि त्याच्या अंगात विष भिनू लागल्याने तातडीने त्याला एनाफिलेटिक्स शॉक देणे गरजेचे होते त्यामुळे त्याला रुग्णालयात हलवावे लागले.

बेअर ग्रील्स भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासह मॅन व्हर्सेस वाइल्ड या शोमध्ये दिसला आणि तेव्हापासून त्याची लोकप्रियता खूपच वाढली आहे. कारण हा शो जगभरात प्रसारित करण्यात आला होता. पुढील महिन्यापासून त्याच ट्रेझर आयलंड हा शो टीव्ही वर येणार आहे.

Leave a Comment