बाप्पाचा आवडता मोदक आपल्यालाही आरोग्यदायी


आज घरोघर आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केली जात आहे. गणेशाची पूजा त्याच्या आवडत्या मोदाकाशिवाय अपूर्णच म्हणायला हवी. वास्तविक गणेशाला मोदक आवडतात तसेच लाडू सुद्धा आवडतात. पण गणेश चतुर्थीच्या दिवशी मात्र आवर्जून मोदकाचा नैवेद्य बाप्पाला दाखविला जातो.

मोदक हे आपल्या शरीरासाठी सुध्दा फायदेशीर आहेत. तांदूळ, गुळ, नारळ आणि तुप या पदार्थातून मोदक बनविले जातात आणि त्याचा स्वाद अप्रतिम असतोच पण ते शरीरासाठी सुद्धा चांगले ठरतात. एक तर लहान मुलांपासून ते घरातील वृद्ध लोकांपर्यत सर्वाना त्याचा आस्वाद घेता येतो. ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांना मोदक तुपाबरोबर खाल्ले कि पोटातील चिकटलेला मळ सुटून बाहेर पडल्यामुळे पोटाला आराम येतो.

मोदाकातील नारळामुळे पचन सुधारते तसेच शरीराला बळ मिळते. त्वचा चमकदार होते, दातातील कीड कमी होते, रक्तदाब नियंत्रणात येतो. गुळामुळे शरीराला आवश्यक आयर्न मिळते. नारळाला श्रीफळ म्हणजे देवाचे फळ म्हटले जाते ते याचमुळे. तुपामुळे शरीराला आवश्यक अशी वसा मिळते जी पचनक्रिया वाढविते. यामुळे रक्तातील वाईट कॉलेस्टरॉल कमी होऊन चांगले कोलेस्टेरॉल वाढते. मधुमेही सुद्धा प्रमाणात मोदक खाऊ शकतात.

बाप्पा साठी तळलेले मोदक अनेक ठिकाणी बनविले जातात. तळलेले मोदक काही दिवस चांगले राहतात. उकड काढून बनविलेले मोदक मात्र लगोलग संपवावे लागतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment