चंद्रायानाचे लँडिंग मोदींसोबत पाहणार ही शेतकरी कन्या


येत्या ७ सप्टेंबरला भारताचे इस्रोने प्रक्षेपित केलेले चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होत असून या ऐतिहासिक क्षणाचा लाइव टेलीकास्ट पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पाहण्याची संधी देशातील ६० विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यात उत्तरप्रदेशातील शेतकरयाची कन्या राशी वर्मा हिचा समावेश आहे.

राशी कानपूर मध्ये १०वीच्या वर्गात असून तिचे वडील गावी शेती करतात तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. राशी तिच्या आत्याकडे राहून शिकते. ती म्हणाली इस्त्रोने देशभरातील ८ ते १२ च्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यासाठी सायन्स क्विझ आयोजित केले होते. त्यात १५० मुले सहभागी झाली होती. यात ऑनलाईनवरून २० प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. राशीने यात भाग घेतला होता. तिची अपेक्षा एखादे प्रमाणपत्र मिळेल अशी होती. मात्र प्रत्यक्षात तिला इस्रो कडून पंतप्रधान मोदींसमवेत चांद्रयान २ लँडिंगचा लाइव टेलीकास्ट पाहण्याचे निमंत्रण आल्यामुळे तिला हा सुखद धक्का बसला.

राशी सांगते माझ्यासाठी ही लॉटरीच आहे. ती आईवडिलांची एकुलती आहे. त्यामुळे आईवडील आणि गावकरी तिला मिळालेल्या संधीमुळे खूप आनंदात आहेत. राशी सांगते, मला पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली, तर त्यांचा फिटनेस आणि वेळेचे व्यवस्थापन याविषयी विचारायची इच्छा आहे. राशीसोबत देशाच्या अन्य राज्यातून आणखी ५९ विद्यार्थी यासाठी निवडले गेले आहेत.

Leave a Comment