मोबाईल युजर्सला चालण्यासाठी या शहरात बनवण्यात आला खास रस्ता


आज प्रत्येक जण सतत मोबाईलचा वापर करत आहे. एकप्रकारे लोकांना मोबाईलचे व्यसनच लागले आहे. लोकांची हीच परिस्थिती बघून चीननंतर आता मॅनचेस्टर येथे देखील मोबाईल युजर्ससाठी एक वेगळा रस्ताच बनवण्यात आला आहे. मॅनचेस्टरमध्ये बनवण्यात आलेली ही लेन युरोपमधील अशाप्रकारची पहिलीच लेन आहे.

याआधी बँकॉकमध्ये देखील मोबाईल फोन लेन बनवण्यात आलेली आहे. या रस्त्यावर लोक मोबाईल फोन वापरत चालू शकतात. सिंगापूरमध्ये लोकांना चालताना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यासाठी रस्त्यावर जागोजागी सुचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. या पिवळ्या रंगाच्या फलकांवर ‘लुक अप’ असे लिहिण्यात आले असून, स्मार्टफोनवर क्रॉस करण्यात आले आहे.

साउथ कोरियामध्ये देखील याचप्रमाणे रस्त्यावर लाइट्स लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून लोक लाइट्स बघून रस्ता बदलताना सावध होतील व मोबाईल बाजूला ठेऊन रस्ता बदलतील.

एओ मोबाइल या संस्थेद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, समोर आले आहे की, 96 टक्के लोकांनी स्विकारले की, चालताना त्यांचा दुसऱ्या व्यक्तीला धक्का लागतो. याचे कारण ते चालताना फोन वापरत असतात.

मॅनचेस्टर प्रमाणेच अनेक शहरात मोबाइल युजर्ससाठी स्लो लेन बनवण्यात यावी असे अनेकांनी म्हटले आहे.

Leave a Comment