चक्क प्राध्यापक झाला हा ऑस्कर विजेता अभिनेता


ऑस्कर विजेता अभिनेता मॅथ्यू मॅककॉनगे हा आता युनिवर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाला आहे. मॅथ्यू मॅककॉनगे युनिवर्सिटीमधील रेडिओ-टेलिव्हिजन-फिल्म या डिपार्टमेंटमध्ये शिकवणार आहे.

मॅककॉनगे 2015 पासून फ्लॅगशिप कॅम्पसमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. युनिवर्सिटीनुसार, त्याची नेमणूक ही त्याच्या कामाची पावतीच आहे. तो स्क्रिप्ट आणि स्क्रीन फिल्म प्रोडक्शन हा कोर्स शिकवणार आहे.

मॅथ्य मॅककॉनगेने 1993 मध्ये चित्रपटासंबंधित पदवी शिक्षण घेतले आहे. त्याने आतापर्यंत 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. द वॉल्फ ऑफ वॉल स्ट्रीट आणि डलास बायर्स क्लब या चित्रपटांतील भुमिकेसाठी त्याला ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब अ‍ॅवार्ड देखील मिळालेला आहे.

Leave a Comment