यामुळे फेसबुकचा लोगो आहे निळ्या रंगाचा


आजच्या ऑनलाइन जगात सोशल नेटवर्किंगमुळे प्रत्येक जण एखाद्या माध्यमातून प्रत्येकाशी जोडला गेला आहे. फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम या सारख्या सोशल मीडिया साइटशी हजारो जण दररोज जोडले जातात. सोशल मीडिया म्हटले की, सर्वात प्रथम नाव येते ते म्हणजे फेसबुकचे. आज फेसबुकविषयी काही रोचक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फेसबुकचा रंग निळाच का आहे ? –
फेसबुकचा रंग निळाच का हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. याचे कारणही विशेष आहे. फेसबुक फाउंडर मार्क झुकरबर्ग केवळ निळाच रंग व्यवस्थितरित्या पाहू शकतात. त्यांना कलर ब्लाइंडनेस आहे. एका टेलिव्हिजन शोमध्ये बोलताना मार्कने सांगितले होते की, लाल-हिरव्या रंगाचा ब्लाइंडनेस आहे. केवळ निळा रंगच स्पष्ट दिसतो. त्यामुळे फेसबुकचा रंग हा निळा आहे.

मार्क झुकरबर्गला शोधणे सोपे –
इंटरनेटवर मार्क झुकरबर्गला शोधणे खुप सोपे आहे. जेव्हा तुम्ही फेसबुक लॉग इन करता  त्यावेळी होमपेजवर युआरएल हे https://www.facebook.com असे असते. या युआरएलच्या पुढे /4 लावल्यास सरळ झुकरबर्गच्या वॉलवर पोहचता.

प्रत्येक सेंकदाला फेसबुकवर 5 नवीन लोक – 
फेसबुककडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 5 सेंकदाला 5 नवीन लोक फेसबुक अकाउंट बनवतात. त्याचबरोबर फेसबुकवर दररोज विविध देशातून 30 करोड फोटो अपलोड केले जातात. दर 60 सेंकदाला 50 हजार कमेंट्स आणि जवळपास 3 लाख स्टेट्स लिहिले जातात. फेसबुकवर सध्या 9 करोड फेक प्रोफाइल्स आहेत.

या देशात फेसबुक बॅन –
फेसबुकचे जगभरात कितीतरी अब्ज युजर्स आहेत. मात्र चीन आणि उत्तर कोरियामध्ये फेसबूकवर बंदी आहे.

यांना ब्लॉक करू शकत नाही –
अनेकदा आपल्याला एखादे प्रोफाइल आवडले नाही तर आपण ते ब्लॉक करतो. मात्र फेसबुकवर एक व्यक्ती अशी आहे, ज्याचे प्रोफाइल ब्लॉक करता येत नाही. ती व्यक्ती स्वतः मार्क झुकरबर्ग आहे. मार्क झुकरबर्गला फेसबुकवर कोणीही ब्लॉक करू शकत नाही.

स्मारक प्रोफाइल (Memorialized Account) – 
जर आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट आहे व त्याचा मृत्यू झाला असेल. तर याबाबत फेसबुकला सुचना देण्यात येते. यानंतर फेसबुक ते प्रोफाइल स्मारक प्रोफाइल बनवते. स्मारक अकाउंट केल्यानंतर ते अकाउंट कोणीच लॉग इन करू शकत नाही. त्यात कोणतेही बदल करता येत नाही.

फेसबुकच्या मालकीचे सोशल साइट्स –
फेसबुकने सध्या व्हॉट्स अॅप आणि इंस्टाग्राम देखील खरेदी केले आहे. या तिन्ही सर्वाधिक वापरले जाणारे सोशल नेटवर्किंग साइट्स आहे. एप्रिल 2012 मध्ये फेसबुकने इंस्टाग्राम आणि 2014 मध्ये व्हॉट्सअप खरेदी केले होते.

Leave a Comment