चुकूनही वेटिंग तिकीटावर करु नका रेल्वे प्रवास… नाही तर


जर तुम्ही रेल्वे काउंटरवरून वेटिंगचे तिकीट घेऊन प्रवास करत असाल, तर आताच सावध व्हा. असे केल्याने तुम्हाला जेल देखील होऊ शकते. रेल्वे अ‍ॅक्ट 1989 अंतर्गत तुमच्या कारवाई केली जाऊ शकते. रेल्वे अ‍ॅक्टमधील कलम 55 नुसार विना तिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. कलम 137 अंतर्गत तुम्हाला 6 महिन्यांची जेल आणि दंड देखील भरावा लागू शकतो.

दुसऱ्याच्या तिकीटावर प्रवास करणे, तिकीट कंफर्म नसेल तरी प्रवास करणे या गोष्टी अडचणीत आणू शकतात. जाणून घेऊया रेल्वेशी संबंधित काय महत्त्वाचे नियम.

  • रेल्वेमध्ये महिलांसाठी आरक्षित डब्ब्यात कोणत्याही पुरूषाने जाणे गुन्हा आहे. अशा पुरूषांना दंड आकारला जातो व टीटीईकडून त्यांना डब्ब्यातून बाहेर काढले जाते.
  • रेल्वे अ‍ॅक्टच्या कलम 156 नुसार, रेल्वेच्या छतावर, पायऱ्यांवर,दरवाजा अथवा इंजिनवर बसून प्रवास केल्यावर तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते. याचबरोबर दंड देखील भरावा लागतो.
  • रेल्वे अ‍ॅक्टच्या कलम 167 नुसार, रेल्वेत स्मोकिंग करणे गुन्हा आहे.
  • जर प्रवासच्या दरम्यान अथवा प्रवास पुर्ण झाल्यावर टीटीई तिकीट दाखवण्यास सांगतो. त्यावेळी प्रवाशाने तिकीट दाखवणे गरजेचे आहे. असे न केल्यास त्या प्रवाशावर कारवाई केली जाऊ शकते.
  • दारू पिऊन रेल्वेत प्रवास करणे, शिव्या देण्यास परवानगी नाही. असे करणाऱ्याला रेल्वेमधून बाहेर काढले जाऊ शकते व त्याचबरोबर रेल्वे अ‍ॅक्ट कलम 145 नुसार कारवाई करण्यात येते. अशा प्रकरणात 6 महिन्यांची जेल आणि दंडाचे प्रावधान आहे.
  • रेल्वे अ‍ॅक्टच्या कलम 141 नुसार, रेल्वेत सामान विकणे व भीक मागणे देखील गुन्हा आहे. असे करणाऱ्याला दंड आणि 1 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
  • रेल्वेच्या परवानगीशिवाय कोणालाही तिकीट विकण्याचा अधिकार नाही. जर एखादा व्यक्ती तिकीट विकताना सापडला तर त्याला तीन महिन्यांची जेल होऊ शकते.
  • रेल्वेमध्ये दगडफेक करणे गुन्हा आहे. असे करणाऱ्यांना रेल्वे अ‍ॅक्टच्या कलम 150 अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
  • रेल्वे अ‍ॅक्टच्या कलम 151 नुसार, रेल्वेमध्ये आग लावणे अथवा रेल्वेला नुकसान पोहचवल्यावर 5 वर्षांची जेल होऊ शकते. त्याचबरोबर दंड देखील आकारला जातो.
  • रेल्वे अक्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार झाला असेल तर त्या व्यक्तीने प्रवास करण्यासाठी रेल्वेची परवानगी घेणे आवश्यक आहे. जर असा प्रवासी आढळला तर त्याला रेल्वेतून खाली उतरवले जाऊ शकते. त्याच्याबरोबर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला देखील खाली उतरवले जाऊ शकते व तिकीट देखील जप्त केले जाते.

Leave a Comment