मारूती सुझुकी 2 लाखांपेक्षा कमी किंमतीत विकत आहे ही कार


गेल्या काही दिवसांपासून कार बाजारावर मंदीचे सावट आहे. लोक नवीन गाडी खरेदी करण्याचा सध्या विचार देखील करत नाहीयेत, त्यामुळे गाड्यांची विक्री मंदावली आहे. जर तुम्ही कमी किंमतीत जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच कारची माहिती घेऊन आलो आहोत.

जुनी कार खरेदी करताना तुमच्याकडे अनेक पर्याय असतात. मात्र सर्वात मोठी समस्या ही कागदपत्रांची तयार होत असते. अशावेळेस कोणत्याही लोकल ठिकाणी कार खरेदी करू नये. जुनी कार विकत घेण्यासाठी महिंद्रा फर्स्ट चॉइस, ड्रुम, मारूती ट्रू वॅल्यू आणि ह्युडाईच्या शोरूमशी नक्की संपर्क करावा.

मारूती देखील जुन्या गाड्यांची विक्री करते. कंपनीच्या शोरूममध्ये ऑल्टो, स्विप्ट, वॅगन-आर आणि सिलेरियो सारख्या जुन्या गाड्या चांगल्या कंडिशन्समध्ये मिळतात. मारती या गाड्या खरेदी करण्याआधी स्वतः टेस्ट देखील करते. येथे जुन्या वॅगन-आरची किंमत केवळ 1.75 लाख रूपये आहे आणि कंपनीचा दावा आहे की, त्यांच्याकडे अशा 135 कार आहेत. कंपनी जुनी गाडी खरेदीवर 1 वर्षांची वॉरंटी आणि 3 वर्ष फ्री सर्विसिंग देखील देते. याचबरोबर जुन्या ऑल्टोची किंमत 1.50 लाख रूपये, सिलेरियो 2.30 लाख रूपये आणि स्विफ्टची 2.50 लाख रूपयांमध्ये कंपनी विक्री करत आहे.

जुनी गाडी खरेदी करताना घ्या काळजी –

  • कार सर्विस हिस्ट्री तपासा, ज्यामध्ये तुम्हाला कारची संपुर्ण माहिती मिळेल.
  • कार खरेदी करताना त्याचे इंश्युरंस, इंश्युरंस पेपर तुमच्या नावावर ट्रांसफर होतील याचीही काळजी घ्या.
  • कार खरेदी करण्याआधी ओळखीच्या मॅकेनिकला नक्की दाखवा.
  • कारमधील सर्व पार्ट्स बॉडी, पेंट, इंजिन, दरवाजे, डिग्गी, हुड, लाइट, काचा इत्यादी तपासून घ्यावेत.
  • कार खरेदी करताना आरसीमध्ये लिहिलेली तारीख बोनटच्या खालील मॅन्युफॅक्चरिंग तारखेशी जुळते की नाही ते तपासा.
  • कार चालवून नक्की बघा. ज्यामुळे कारबद्दल माहिती मिळते.

Leave a Comment