अमेरिका बनावट सोशल मीडिया अकाउंटद्वारे देशात येणाऱ्यांवर ठेवणार लक्ष


अमेरिकन इमिग्रेशन सेवा (यूएससीआयएस) चे अधिकारी सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स बनवून वीजा, ग्रीन कार्ड आणि नागरिक्त्व घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांवर लक्ष्य ठेवत आहेत. अधिकाऱ्यांवर बनावट अकाउंट उघडण्यासंदर्भात घालण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे.

यूएससीआयएसकडून सांगण्यात येत आहे की, अधिकारी बनावट अकाउंट बनवून लक्ष्य ठेतील व पुरावा मिळवण्यास सोपे जाईल आणि एखाद्या नागरिकाला अमेरिकेत प्रवेश देताना सुरक्षेचा काही धोका तर नाही हे ओळखण्यास मदत होईल.

याआधी अमेरिकेत वीजाचा अर्ज करणाऱ्यांना सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती देणे गरजेचे आहे.  ट्रम्प सरकारने या संबंधित बदल केले असून, याद्वारे येणाऱ्या प्रवाशांची सखोल चौकशी केली जाईल.

ट्विटर आणि फेसबूकने मोठ्या संख्येत बनावट अकाउंट बंद केले आहेत, त्यामुळे हे अधिकाऱ्या कशाप्रकारे अकाउंट्स उघडणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकन गृह मंत्रालयाच्या या निर्णयावर ट्विटरने म्हटले आहे की, बनावट अकाउंट उघडून लोकांची हेरगिरी करणे हे आमच्या पॉलिसीच्या विरोधात आहे.

गृह मंत्रालयानुसार, या प्रकरणाची चौकशी गरज पडल्यास राष्ट्रीय सुरक्षा एजेंसी मार्फत करण्यात येईल. हे अधिकारी युजर्सची सार्वजनिकरित्या असलेल्या माहितीचीच चौकशी करू शकतील. ते युजर्सला फ्रेंड अथवा फॉलो करू शकणार नाही. तसेच सोशल मीडियावर युजर्सशी संवाद देखील करता येणार नाही.

Leave a Comment