रू. 25 हजारांच्या आतील हे आहेत 13 सर्वोत्तम स्मार्टफोन


आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो. बाजारात दरदिवशी एखाद्या कंपनीचा स्मार्टफोन लाँच होत असतो. अशावेळेस नवीन स्मार्टफोन खरेदी करताना, कोणता खरेदी करावा याबाबत निर्णय घेता येत नाही. आज आम्ही तुम्हाला असेच 13 स्मार्टफोन्स सांगणार आहोत, ज्याची किंमत 25 हजार रूपयांच्या आत आहे.

रेअलमी 5 प्रो –
48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला 15 हजार रूपयांच्या आत मिळणारा रेडमी 5 प्रो हा एकमेव फोन आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 13,999 रूपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची 14,999 रूपये आणि 8 जीबी 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत रूपये 16,999 आहे. या फोनमध्ये क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आहे.

रेअलमी एक्स –
रेअलमीचे दोन वेरिअट्स असून, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व 8जीबी/128 स्टोरेजची किंमत 19,998 रूपये आहे. यामध्ये 6.5 इंचचा एचडी डिस्पले आहे. याचबरोबर ड्युल रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सल व 5 मेगापिक्सल आणि फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

ओप्पो के3 –
काही दिवसांपुर्वीच लाँच झालेल्या ओप्पो के3 ची किंमत रेअलमी एक्स एवढीच 16,990 रू आहे. यामध्ये 16 मेगापिक्सल पॉप-अप कॅमेरा आहे. तसेच 6.5 इंचचा फुल एचडी डिस्पले आणि क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे.

विवो झेड1 प्रो  –
या फोनची किंमत रू.14,990 किंमत आहे. यामध्ये क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आहे. तसेच 6.5 इंचचा फुल एचडी डिस्पले आणि 5000 एमएएचची बॅटरी देखील या फोनमध्ये आहे. 6 जीबी रॅम असलेल्या व्हर्जनची किंमत 17,990 रूपये आहे.

शाओमी पोको एफ 1 –
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आहे. तसेत 6.2 इंच फुल एचडी डिस्प्ले, ड्युल रिअर कॅमेरा 12 + 5 मेगापिक्सल आणि 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये आहे. याची किंमत 17,990 रूपये आहे.

मोटोरोला वन एक्शन  –
या फोनची किंमत रूपये 19,999 रूपये आहे. यामध्ये 6.3 इंच फुल एचडी डिस्प्ले असून, ट्रिपल रिअर कॅमेरा देखील आहे. 12 मेगापिक्सल प्राइमरी सेन्सर + 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड व्हिडीओ कॅमेरा + 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असलेले कॅमेरे या फोनमध्ये देण्यात आले आहेत.

अॅपल आयफोन एस6 –
या फोनची किंमत 28,999 रूपये आहे. अपलचा सध्याचा सर्वात स्वस्त फोन आहे.

एलजी जी7 थिंकक्यू –
मागील वर्षी लाँच झालेल्या या फोनची किंमत 24,850 रूपये आहे. यामध्ये 6.1 इंच एचडी डिस्प्ले आणि क्वॉलकम स्नॅफड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे.  तसेच यामध्ये 16+16 असे दोन रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

असूस झेनफोन 5 झेड –
सध्या या फोनची मर्यादित काळासाठी किंमत 23,999 रूपये आहे. या मध्ये क्वॉलकम 845 प्रोसेसर देण्यात आला आहे.  याचबरोबर 6.2 इंच एचडी डिस्पले आणि 3300 एमएच बॅटरी आहे. तसेच 12+8 मेगापिक्सल ड्युल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 –
चीनी कंपनीचा फोन नको असणाऱ्यांनी हा फोन नक्कीच घ्यायला हवा. या फोनची किंमत 18, 490 रूपये आहे. यामध्ये एक्सयोन्स 9610 प्रोसेसर आणि 6.4 इंच स्पोर्ट्स एचडी डिस्प्ले आहे. 25+5+8 मेगापिक्सल असे ट्रिपल रेअर कॅमेरे व 25 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम 40 –
या फोनची किंमत 19,990 रूपये असून, यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, याचबरोबर 32+8+5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये अँड्राइड 9.0 पाय ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.

नोकिया 8.1 –
या फोनची सध्या किंमत 18,890 रूपये असून, यामध्ये 6.2 इंच फुल एचडी डिस्प्ले न क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे. यामध्ये 3500 एमएएचची बॅटरी देखील आहे.

ह्युएई वाय 9 प्राइम – 
या फोनमध्ये 16+8+2 मेगापिक्सलचे ट्रिपल रिअर कॅमेरे व 6 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये कंपनीचे स्वतःचे किरीन 710 प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment