हॅकर्सचा ट्विटरच्या सीईओंना दणका


ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सीचे ट्विटर अकाउंट शुक्रवारी हॅक झाले होते. मात्र नंतर अकाउंट रि-स्टोर करण्यात आले. अकाउंट हॅक केल्यानंतर जॅक डॉर्सीच्या अकाउंटवर हॅकर्सनी अनेक आक्षेपार्ह ट्विट्स केले.

हॅकर्सने केलेले अनेक ट्विट्स अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ प्रोफाइलवर होते. मात्र नंतर ट्विटरच्या टीमने ते ट्विट्स हटवले. जॅक डॉर्सी यांचे ट्विटरवर 42 लाख फॉलोवर्स आहेत.

कोणत्याही हॅकर्स ग्रुपने ट्विटर अकाउंट हॅक केले होते हे अद्याप समोर आलेले नाही. अकाउंटवरून अनेक अपमानकारक आणि वंशद्वेषी ट्विट करण्यात आले होते.  जॅकच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. तर काहीजण त्यांचा पासवर्ड खूपच साधा होता, असे म्हणत ट्रोल करत आहेत.

एका रिपोर्ट्सनुसार, हॅकरने जॅकचे अकाउंट हॅक करण्यासाठी सिम स्वॅपिंगचा वापर केला. सिम स्वॅपिंगद्वारे हॅकर्सने मोबाईल नंबरवर ओटीपी मागवला आणि अकाउंट हॅक केले.

Leave a Comment