युनिव्हर्सल बॉस अशी ख्याती प्राप्त असलेला वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूरच आहे. कारण भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली नाही.
रंग बदलण्यासाठी हे काय करत आहे युनिव्हर्सल बॉस
नुकत्याच संपन्न झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो निवृत्त होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानेच या चर्चांना बगल दिली.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गेलने ४१ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७२ धावांची तुफानी खेळी साकारली.
त्याला भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळायची होती. पण निवड समितीने गेलला कसोटी संघात स्थान दिले नाही.
यादरम्यान तो एका नव्या अवतारात दिसून आला. आपला रंग बदलण्यासाठी तो चक्क मड बाथ घेत असल्याचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.