धक्कादायक! तब्बल 250 मुलांचे डॉक्टरने केले लैंगिक शोषण


पॅरिस – बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एका 66 वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले आहे. ही व्यक्ती गेल्या एक दशकाहून अधिक कालावधीत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करत होती. या व्यक्तीने 2017 साली चार व सहा वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला, या व्यक्तीला त्यावेळी अटक झाली. या व्यक्तीचे जोएल ले स्कॉर्नेक असे नाव आहे. फ्रान्स देशाची ही व्यक्ती रहिवाशी असून विशेष म्हणजे ही व्यक्ती पेश्याने डॉक्टर आहे.

पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर या मुलींवर आपण बलात्कार नाही तर त्यांच्या शारीरिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. पण चौकशी दरम्यान या व्यक्तीच्या डायरीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे आतापर्यंत तब्बल 250 मुलांचे या व्यक्तीने लैंगिक शोषण केले आहे. या व्यक्तीने डॉक्टर असल्याचा फायदा घेत अनेक मुलांवर बलात्कार केला आहे. हे देशातील बाल लैंगिक अत्याचारासंदर्भातील हे सर्वात मोठे प्रकरण असल्याचे ‘द एक्सप्रेस’ या न्यूज मासिकाने,म्हटले आहे.

या डॉक्टरवर 14 वर्षांपूर्वीच अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्याला न्यायालयाने प्रॅक्टीस करण्याची परवानगी दिली होती. या डॉक्टरने त्या काळात 250 पेक्षा जास्त मुलाचे लैंगिक शोषण केले. या सर्व कृत्याची माहिती त्याच्या डायरीमधून मिळाली. पेशंटला भूल दिल्यानंतर या डॉक्टरने त्यांच्यावरही बलात्कार केले आहेत. तसेच अनेक प्रकरणांमध्ये ऑपरेशन झाल्यावर त्या पेशंटवर बलात्कार केला गेला आहे. हे पाहता या व्यक्तीने पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्याला अक्षरशः काळिमा फासला आहे.

Leave a Comment