ट्रम्प यांची स्वीय सहाय्यक मॅडेलिन हिला एका महिन्याला मिळायचे एवढे वेतन


नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निकटवर्तीय आणि स्वीय सहाय्यक मॅडेलिन वेस्टरहाऊट हिची नोकरीवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तिच्यावर ट्रम्प कुटुंबीयांची खासगी माहिती उघड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हाइट हाऊसकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

यासंदर्भात अमेरिकेतील सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार मॅडेलिन वेस्टरहाऊटने न्यूजर्सीत सुट्टीच्या वेळी ट्रम्प कुटुंबीयांची खासगी माहिती काही लोकांना सांगितली होती. तिच्याकडून ही माहिती दारुच्या नशेत दिली गेल्याचे समजते.

ट्रम्प यांच्या कार्यालयात काम मॅडेलिन वेस्टरहाऊट पहिल्या दिवसापासून करते. तिला ट्रम्प यांची गेटकीपर असे अमेरिकन माध्यमांमध्ये तिला जात होते.

मॅडेलिन ही नेहमीच ट्रम्प यांच्या कार्यालयात पाहुण्यांसोबत दिसत असे. 1 लाख 45 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 1 कोटी रुपये वेतन तिला महिन्याला मिळत होते.

व्हाइट हाऊसच्या सूत्रांच्या हवाल्याने सीबीएस न्यूजने एका हेराप्रमाणे मॅडेलिन काम करत होती असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी दोन महिन्यांपूर्वी ट्विटरवरून नवीन स्वीय सहाय्यक नेमण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.

Leave a Comment