पीएफचा व्याजदर ८.६५ टक्क्यांवर


नवी दिल्ली: पीएफवरील (प्रोव्हिडंट फंड) व्याजदर वाढवण्याचा निर्णय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने ( ईपीएफओ) घेतला आहे. पीएफवर सध्या वार्षिक ८.५५ टक्के एवढे व्याज मिळते. आता हाच व्याजदर ८.६५ टक्के एवढा करण्यात आला आहे. या निर्णयाचा ईपीएफओच्या देशभरातील तब्बल ६ कोटी खातेधारकांना लाभ मिळेल.

व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’( सीबीटी) ही ईपीएफओची निर्णय घेणारी प्रमुख समिती घेत असते. व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या सदस्यांनी घेतल्यानंतर तो प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हे मंजूर दरानुसार व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.

हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. आर्थिक वर्ष २०१६ नंतर प्रथमच पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावावर अर्थमंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली.

Leave a Comment