सरोगेट मदर होणार क्रिती सॅनॉन ?


2014 साली हिरोपंती या चित्रपटाद्वारे टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ती कायमच तिच्या हसण्याने व मनमोकळ्या स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. तिने ‘बरेली की बर्फी’ ,’लुका छुपी’ अशा चित्रपटांमधून अभिनयाची छाप पडल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येण्यास क्रिती सज्ज झाली आहे. लवकरच ‘मिमी’ या चित्रपटामध्ये क्रिती झळकणार आहे.


क्रितीच्या ‘मिमी’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच या चित्रपटाचा फर्स्ट लूक आता रिलीज करण्यात आला आहे. सरोगसीवर आधारित हा चित्रपट असून यात क्रिती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यामध्ये एका हातामध्ये बाळ झोपले असून त्याला घेण्यासाठी दुसरा हात पुढे सरसावताना दिसत आहे. क्रितीने हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तिने या पोस्टरला आयुष्यातील असा प्रवास जो अशक्य अशा चमत्कारीक गोष्टींनी भरलेला आहे. या प्रवासासाठी तयार व्हा. ‘मिमी’ हा खूप खास असणार आहे, असे कॅप्शन दिले आहे.

‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर आधारित ‘मिमी’ हा चित्रपट आहे. २०११ मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात एक विदेशी आणि गरीब भारतीय महिलेची कथा दाखविण्यात आली असून चित्रपटाची मूळ कथा एका बाळाभोवती फिरताना दिसते. त्यामुळे हा चित्रपट आता हिंदीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण उतेकर ‘मिमी’चे दिग्दर्शन करत आहेत. दरम्यान, चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत आहे. क्रितीसोबत या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment