घरकुल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह 48 आरोपी दोषी


धुळे : गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह 48 आरोपींना राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले आहे. दोषींना धुळे जिल्हा न्यायालयात न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ शिक्षा सुनावणार आहेत. या घोटाळ्याचा तब्बल वीस वर्षांनंतर निकाल हाती येत आहे.

45 कोटी रुपयांचा जळगाव घरकुल घोटाळ्यात अपहार झाल्याचा आरोप आहे. सुरुवातीला 57 संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे उर्वरित 48 दोषींबाबत निकाल हाती येत आहे.

जळगाव घरकुल घोटाळा हे हायप्रोफाईल प्रकरण असल्यामुळे सर्व संशयित आणि त्यांच्या वकिलांना न्यायालयात बोलावण्यात आले आहे. सुनावणी दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते.

Leave a Comment