Google Doodle; जाणून घ्या या लोकप्रिय पंजाबी कवियत्रीबद्दल


आज लोकप्रिय पंजाबी कवियत्री अमृता प्रीतम यांचा 100वा स्मृतिदिन असल्यामुळे गुगलने अमृता प्रितम यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत डूडल साकारले आहे. कवियत्री अमृता प्रीतम यांच्या बाबत सांगायचे झाले तर आपले शब्द कवितेच्या माध्यमातून कागदावर उतरवणारी आणि असंख्य वाचक, रसिक आणि चाहत्यांच्या हृदयापर्यंत पोहचवणारी अशी खास ओळख आहे. नल-दमयंती, हिर रांजा, रोमिओ-ज्युलिएट यांसारख्या प्रेमी जोड्या आता एक दंतकथा बनून राहिल्या आहेत. जगप्रसिद्ध अशा प्रेमी युगुलांच्या जोड्यांची यादी पूर्ण करायची तर, अलिकडील काळातील नाव अमृता प्रीतम यांच्या नावाशिाय ती पूर्णच होणार नाही. विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलनेही त्यांची लेखणी आणि प्रेम या दोन्हीची लोकप्रियता विचारात घेऊन इंटरनेट अमृता प्रीतम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. डूडलच्या माध्यमातून गुगलने अमृता प्रीतम यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.

अमृता प्रीतम यांचे नाव पंजाबी भाषेतील लोकप्रिय लेखकांमध्ये सर्वात अग्रस्थानी येते. अमृता प्रीतम यांच्या नावावर पंजाबी भाषेतील पहिली कवियत्री असा बहुमानही आहे. आजच्या डूडलमध्ये अमृता प्रीतम यांचे एक चित्र आपणास पाहायला मिळते. ज्यात त्या काही लिहिताना दिसतात. आजच्या डूडलवर क्लिक करताच गूगलच्या माध्यमातून अमृता प्रीतम यांच्याविषयी माहिती देणाऱ्या लिंकचे शेकडो दुवे पाहायला मिळतात.

1919 मध्ये गुजरांवाला पंजाब येथे अमृता प्रीतम यांचा जन्म झाला. लाहोर येथे त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण हे झाले. बालपणापासूनच त्यांना कवितांची आवड होती. त्या केवळ कविताच नव्हे तर, कथा आणि लेखही लिहित असत. लिखाण हा जणू त्यांचा आत्मा होता. वाचकांना त्यांच्या ‘पांच बरस लंबी सड़क’, ‘पिंजर’, ‘अदालत’, ‘कोरे कागज’, ‘उन्चास दिन’, ‘सागर और सीपियां’ यांसारख्या बहारदार कादंबऱ्यांनी भारुन टाकले.

मोठमोठे साहित्यिक आणि रसिक वाचक त्यांच्या लेखणीतील ताकद पाहून त्यांचे कौतुक करत. अमृता प्रीतम यांना साहित्य सेवेसाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना 1957 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 1958 मध्ये पंजाब सरकारद्वारा देण्यात येणारा भाषा विभाग पुरस्कार, 1988 मध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचा बल्गारिया वैरोव पुरस्कार आणि 1982 मध्ये भारताचा सर्वोच्च समजला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, अमृता प्रीतम-साहिर लुधियानवी आणि चित्रकार इमरोज हा प्रेमाचा त्रिकोण आजही अनेकांच्या कौतुकाचा चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरला आहे. आपापल्या ठिकाणी तिघेही उच्च कोटीचे प्रतिभावंत होते. सुरुवातीला अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्यात निर्माण झालेले प्रेम आणि त्यात आलेला चित्रकार इमरोज नावाचा आलेला एक वेगळा कोण. त्यातून निर्माण झालेला प्रेमाचा त्रिकोण हे सगळेच काही और होते. एवढ्या अल्प शब्दांत त्यांची प्रेम कहाणी लिहिणे केवळ कठीणच नव्हे तर अशक्य आहे.

Leave a Comment