ट्रम्प यांच्या निकटवर्तीय मेडेलिन यांची उचलबांगडी


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची खाजगी सहाय्यक मेडेलिन वेस्ट्रेहॉट हिला व्हाइट हाउसमधून काढून टाकण्यात आले आहे. तिला व्हाइट हाउसमधून राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. 29 वर्षीय मेडेलिन ट्रम्प यांच्या जवळची मानली जाते. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ती व्हाइट हाउसमध्ये कार्यरत आहे.

एका रिपोर्टनुसार, तिच्यावर आरोप आहे की, सुट्टीवर असताना दारूच्या नशेत ती पत्रकारांबरोबर गप्पा मारत होती व यावेळी तिने राष्ट्रपतींच्या कुटुंबातील खाजगी माहिती लीक केली. व्हाइट हाउसकडून अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, ती पहिल्या दिवसापासून हेरगिरी करण्यात व्यस्त होती. तिने राष्ट्रपतींच्या जवळ राहून त्या पदाचा गैरवापर केला आहे.

व्हाइट हाउसबद्दल प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये देखील उल्लेख करण्यात आला आहे की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर रिपब्लिकन नॅशनल पार्टीची सदस्य असलेली मेडेलिन दुखी झाली होती. या निर्णयामुळे ती निराश झाली होती. त्यावेळी तिला अनेकांनी रडताना पाहिले होते. मात्र तरी देखील ती व्हाइट हाउसमध्ये कार्यरत होती.

Leave a Comment