वन प्लस टी ७ ची फीचर्स, फोटो लिक


ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या वन प्लसच्या नव्या वन प्लस टी ७ आणि ७ प्रो स्मार्टफोनची फीचर्स आणि फोटो लाँचिंग पूर्वीच लिक झाले आहेत. पॉप्युलर टिप्सटर ईशान अगरवालने ट्विटरवर वन प्लस टी ७ आणि टी ७ प्रो २६ डिसेंबरला दिल्लीत होत असलेल्या इव्हेंट मध्ये लाँच केला जात असल्याची माहिती दिली असून हा फोन ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हेरीयंट मध्ये येत असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरवरील माहितीनुसार टी ७ फ्रोस्टेड सिल्व्हर आणि हेज ब्ल्यू कलर मध्ये येईल. या स्मार्टफोन साठी ६.५५ इंची २ के सुपर एमोलेड डिस्प्ले छोट्या नॉचसह असेल. फोनसाठी स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर असून हा प्रोसिसर हाय एंड गेमिंग फोनसाठी अतिशय उत्तम ठरेल असे समजते. फोनच्या रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट अप असून ४८ + १६ +१२ एमपीचे कॅमेरे स्लो मोशन, वाईड अँगल व्हिडीओ व नाईट स्केप सारख्या ऑप्शन सह दिले गेले आहेत. फ्रंटला सेल्फी साठी १६ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. रिअरचा कॅमेरा सेटअप एका वर्तुळात असल्याने डिझाईनला वेगळा लुक आला आहे.

या फोनच्या लाँचिंग संदर्भात कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा फोन ५ जी व्हेरीयंट मध्येही येऊ शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment