या लव्ह ट्रेनमध्ये ३ वर्षात झाले फक्त १० विवाह


भारतात विवाह या खासगी बाबीला आता व्यवसायाचे स्वरूप आले आहे. परिणामी विवाह संस्था, वेडिंग प्लॅनर, प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट, त्यातून रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत आणि या क्षेत्रातील लोक चांगली कमाई करत आहेत. भारतासह जगभरात अविवाहित मुली मुलांची संख्या वाढत चालली असून चीन यात आघाडीवर आहे. चीन मध्ये अविवाहित मुली मुलांची संख्या २० कोटींच्या घरात गेली आहे.

यावर नियंत्रण आणण्यासाठी चीन सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने तीन वर्षापूर्वी एका लग्न जुळणी संस्थेसह हातमिळवणी करून एक विशेष ट्रेन सुरु केली आहे. यात फक्त अविवाहित तरुण तरुणी प्रवास करू शकतात. लव पर्स्युट या नावाने ही रेल्वे चंग्दू रेल्वे प्राधिकरण चालविते. येथे या लग्नाळू मुलामुलींना एकमेकांची ओळख व्हावी, गप्पा व्हाव्यात अशी सोय दिली जाते. एकमेकांच्याबरोबर वेळ घालविता यावा म्हणून गेम्स, जेवण आयोजित केले जाते.

पण गेल्या तीन वर्षात या ट्रेनमधून ३ हजार अविवाहीत मुलामुलींनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे मात्र त्यातून फक्त १० विवाह होऊ शकले आहेत असे समजते.

Leave a Comment