माही सध्या काय करतोय?


टीम इंडियाचा माजी कप्तान आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी क्रिकेट वर्ल्ड कपचे सामने झाल्यानंतर दोन महिने ब्रेकवर आहे. द. आफ्रिकेत होत सप्टेंबरमध्ये होत असलेल्या टी २० मालिकेतून त्याला वगळले गेले आहे. त्यामुळे सध्या माही काय करतोय याची अनेकांना उत्सुकता आहे.

वर्ल्ड कप संपल्यानंतर माहीने भारतीय लष्कराच्या टेरेटोरीयल आर्मीमध्ये पंधरा दिवस सैनिकांसोबत काश्मीर भागात ड्युटी बजावली आहे. धोनीला २०११ मध्ये मानद लेफ्ट.कर्नलचा हुद्दा दिला गेला आहे. या ड्युटीनंतर धोनी सध्या अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करतो आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवस भारतात २९ ऑगस्टरोजी साजरा झाला तेव्हा धोनीने हा दिवस अमेरिकेत गोल्फ खेळून साजरा केला. त्यावेळी त्याच्यासोबत क्रिकेटपटू केदार जाधव होता. केदारने हे फोटो त्याच्या ट्विटर अकौंटवर शेअर केले आहेत.

धोनी आणि केदार चेन्नई सुपर किंग्सचे सहकारी खेळाडू आहेत. केदारने शेअर केलेल्या फोटोत धोनी कमांडो लुक मध्ये डोक्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत दिसत आहे तर केदारने निळी टोपी घातली आहे. केदारने राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तो म्हणतो हॉकीचे जादुगार ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस. त्यांची आठवण कायम राहील.

Leave a Comment