कलम 370 रद्द केल्याने उर्मिलाचा झाला तीळपापड


बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यासाठी उर्मिलाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिने सांगितले की गेल्या 22 दिवसांपासून तिचा नवरा काश्मीरमध्ये राहणाऱ्या त्याच्या आई-वडीलांशी बोलू शकला नाही.

काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविणारी मातोंडकरने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रश्न फक्त कलम 370 काढून टाकण्याचा नाही. ते अमानवीय पद्धतीने काढून टाकण्यात आले आहे.

उर्मिला मातोंडकर म्हणाली, माझे सासरे तिथेच राहतात. दोघेही मधुमेह, उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. आज 22 वा दिवस आहे, मी किंवा माझे पती दोघेही त्यांच्याशी बोलू शकलेले नाही. घरी औषधे उपलब्ध आहेत की नाही याची आम्हाला कल्पना नाही.

दरम्यान उर्मिला मातोंडकरने आपल्या वयापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या मोहसीन अख्तरशी लग्न केले. मोहसीन हा व्यवसाय करणाऱ्या काश्मिरी कुटुंबातील आहे. उर्मिलाच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते.

नुकतीच उर्मिला मातोंडकरने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नव्या योजनेविषयी सांगितले. उर्मिलाने राज्यातील जनतेला वेगवेगळ्या विषयांवर टीक-टॉक व्हिडिओ बनवा असे आवाहन केले. तसेच, ज्यांचा व्हिडिओ चांगला असल्याचे सिद्ध होईल, त्याची बॉलीवूड कलाकारांशी भेट करुन देण्यात येईल, असे म्हटले आहे.

Leave a Comment