अंकारा- 12 हजार वर्षे जुने शहर काही दिवसातच तुर्कीच्या हसनकीफ शहरात “इलिसु” धरण बांधल्यामुळे पाण्याखाली जाणार आहे. याबाबत शोधकर्त्यांचे म्हणने आहे की, मेसोपोटामियाच्या सर्वात जुन्या शहरांपैकी हे एक आहे.
तुर्कीमधील चौथे सर्वात मोठे धरण इलिसु धरण आहे. अनेक वर्षांपासून हे धरण वादाच्या भोवऱ्यात होते. मागच्या वर्षी धरणामुळे 600 वर्षे जुन्या मस्जिदला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावे लागले. रिपोर्टनुसार, 80 हजारपेक्षा अधिक लोक धरण बांधल्यामुळे बेघर होणार आहेत.
स्थानिक गव्हर्नरने काही दिवसांपूर्वी सांगितले की, 8 ऑक्टोबरला हसनकीफची घेराबंदी केली जाईल. तेथील रहिवाश्यांना घर रिकामे करण्यासाठी 1 महिन्यांचा वेळ दिला होता. धरण बनवल्यानंतर मोठी विजेची उत्पत्ती होईल.
दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये हे शहर टिगरिस(दजला) नदीच्या किनाऱ्यावर आहे. इतिहासकारानुसार ऐतिहासिक रूपाने महत्वाचे असलेले हे शहर 12 व्या शतकातील आहे. शहरात त्या काळातील पुलाचे अवशेष, 15 व्या शतकातील मकबरे, दोन मस्जिदचे अवशेष आणि शेकडो नैसर्गिक गुफा आहेत.