सिनेमा क्वालिटी व्हिडिओ शूट करेल पॅनासोनिकचा 6K कॅमेरा


नवीन DC-S1H कॅमरा पॅनासोनिक लुमिक्सने लॉन्च केला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट डिजिटल सिंगल-लेंस फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा आहे. सिनेमा क्वालिटी व्हिडिओ यातून आउटपुट मिळेल. DC-S1 आणि DC-S1R सीरीजमधील हा लुमिक्स कॅमेरा आहे. प्रोफेशनल-ग्रेड आणि फुल-फ्रेम मिररलेस हे सर्व कॅमरे आहेत. लुमिक्स DC-S1H सेंसर रेजोल्यूशनला 24.2-मेगापिक्सलपर्यंत सेट करता येते. हा जगातील पहिला 6K रेजोल्यूशन कॅमेरा आहे.

फुल V-Log/ V-Gamut सोबतच डायनामिक रेंजचे 14 प्लस स्टॉप्स लुमिक्स DC-S1H मध्ये दिले आहेत. हा 6K फुल फ्रेम कॅप्चर करतो. तर, 4:2:2 10-बिट इंटरनल रेकॉर्डिंग आणि सिनेमा 4K रिकॉर्डिंग(60p)ला सपोर्ट करतो. कंपनीच्या प्रेस रिलीजनुसार हा 6K (24p) रेकॉर्डिंग असलेला पहिला कॅमेरा आहे. यात डुअल नेटिव ISO दिले आहेत. तर, याची व्हिडिओ रेकॉर्डिंगदरम्यान मैक्सिमम ISO 51200 आहे.

यात हीट डिस्प्रेशन टेक्नोलॉजी कंपनीने दिली आहे. यात 5.9K/30p (16:9 आसपेक्ट रेशियो) आणि 10-बिट 60p 4K/C4K व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील करता येते. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये हेंडलिंगदरम्यान शेकी शॉट्सला हे अवॉयड करतो. कंपनीने यात अनलिमिटेड रेकॉर्डिंग टाइम फीचरदेखील दिले आहे.

5-अॅक्सिस बॉडी इमेज स्टेबलाइज्ड आणि 2-अॅक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेश लुमिक्स DC-S1H मध्ये दिले असल्यामुळे स्लो शटर स्पीडदरम्यान स्थिर व्हिडिओ शूटींमध्ये मदत मिळते. पॅनासोनिक लुमिक्स DC-S1H ची किंमत 4000 डॉलर (अंदाजे 2.90 लाख) रुपये आहे. ही याच्या फक्त बॉडीची किंमत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment