मुंबईत झाले हायटेक ‘लाइफलाइन’ एक्सप्रेसचे आगमन


देशातील पहिली हॉस्पिटल रेल्वे लाइफलाइन एक्सप्रेस गुरूवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहचली. लाइफलाइन एक्सप्रेस आतापर्यंत देशातील अनेक ठिकाणांवर 12 लाख रूग्णांना उपचार पुरवले आहेत. एक्सप्रेसने आतापर्यंत भारतातील 19 राज्यांमध्ये प्रवास केला असून, ज्यामध्ये 138 जिल्ह्यातील 201 ग्रामीण भागांमध्ये प्रवास केला आहे. आतापर्यंत 12.32 लाख लोकांचे उपचार केले असून, ज्यामध्ये 1.46 लाख जणांची सर्जरी केली आहे.

ग्रामीण आणि मागासलेल्या भागात रूग्णांची एक यादी बनवली जाते आणि त्या हिशोबाने प्रत्येकावर उपचार केले जातात. त्यानंतर लाइफलाइन एक्सप्रेसला कॅम्प वाल्या भागात पोहचवले जाते. देण्यात आलेल्या तारखेनुसार रूग्णांचे चेकअप आणि सर्जरी होते. अनेक मोठमोठ्या कंपन्या यामध्ये सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) अंतर्गत मदत करतात. यासाठी रूग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

लाइफलाइन एक्सप्रेससाठी रेल्वेचे जुने डब्बे ठिक करून हॉस्पिटलमध्ये बदलण्यात आले. मागील 28 वर्षात केवळ 1 रेल्वे अशी तयार करण्यात आली आहे. तर नियमांनुसार या वेळेत प्रत्येक झोनमध्ये एक रेल्वे असणे गरजेचे होते.

रेल्वेला एका प्रोजेक्टच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी 1 ते 1.5 करोड रूपये खर्च येतो. सुरूवातीला या रेल्वेद्वारे आदिवासी भागांमध्ये मोतीबिंदूचा उपचार केल जात होता. मात्र आता प्लॅस्टिक सर्जरी, ईएनटी आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर देखील उपचार केले जातात.

Leave a Comment