यामुळे त्या पठ्ठ्याने केले एकाच वेळी दोन प्रेयसींसोबत लग्न


एकाच वेळी आपल्या दोन प्रेयसींबरोबर इंडोनेशियामधील एका तरुणाने लग्न केले आहे. या तरुणाने दोघींशी एकाच वेळी लग्न करण्याचा निर्णय दोघींपैकी कोणालाही दु:ख होऊ नये म्हणून घेतल्याचे ‘व्हाइस इंडोनेशिया’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. फेसबुकवर या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तरुणाच्या दोन्ही बाजूला त्याच्या प्रेयसी बसलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

हा आगळावेगळा विवाहसोहळा १७ ऑगस्ट रोजी कालीमंता येथील अरितारप येथे पार पडला. या मुलाने दोघींशी एकाच वेळी लग्न करण्यासाठी मुलीच्या घरच्यांना हुंड्याची मोठी रक्कम दिल्याचे व्हाइस मिडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. नवरा मुलगा नवरीच्या घरच्यांना हुंडा देणे ही इंडोनेशियामध्ये सामान्य प्रथा आहे. मुलीची मुलगा योग्य काळजी घेईल हे दाखवण्यासाठी हुंडा देण्याची पद्धत इंडोनेशियामध्ये पूर्वापार चालत आली आहे.

लग्नाच्या वेळीची वचने बोलताना हा तरुण अडखळताना या तिघांच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही तरुणी एकमेकींना ओळखतात. एकमेकींशी त्या दोघींनाही कोणतीही अचडण नसून हे लग्न त्यांच्या संमतीनेच एकाच वेळी करण्यात आले आहे. या दोघीही मला प्रिय असून त्यांच्यापैकी कोणालाच मी दुखवू शकत नव्हतो म्हणून मी एकाच वेळी दोघींशी लग्न करण्याचा निर्णय घेताल असे या मुलाने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलातना सांगितले आहे.

इंडोनेशियामध्ये कायद्याने एकापेक्षा अधिक महिलांशी लग्न करणे गुन्हा ठरवण्यात येत नाही. एका पुरुषाला कायद्यानुसार चार महिलांशी लग्न करण्याची परवानगी आहे. पण या पुरुषालाच या सर्व महिलांचा संभाळ करण्याची जबाबदारी घ्यावी लागते.

Leave a Comment