या व्यक्तीच्या नावावर आहेत थॉमस एडिसन यांच्यापेक्षाही अधिक पेटंट्स


इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावणारे शास्त्रज्ञ थॉमस एल्वा एडिसन यांना तर सगळेच ओळखतात. थॉमस एडिसन यांच्या नावावर तब्बल 1084 पेटंट्स होते. मात्र आता थॉमस एल्वा एडिसन यांच्या नावावरील हा विक्रम तुटला आहे. मूळ भारतीय वंशाचा असलेल्या 58 वर्षीय गुरतेज संधूने हा विक्रम मोडला असून, त्याच्या नावावर 1325 पेटट्स आहेत. याचबरोबर तो सर्वाधिक शोध लावणाऱ्या शास्रज्ञांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.

गुरतेज सध्या अमेरिकेतील इडाहो येथे राहत असून, तो मायक्रॉन टेक्नोलॉजी कंपनीत तो वॉइस प्रेसिडेंट आहे. आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने 1990 मध्ये युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथून भौतिकशास्त्रामध्ये पीएचडी केली. मायक्रोन कंपनीमध्ये काम करत असताना गुरतेजने त्याचे सुरूवातीचे पेटट्स मिळवले. त्याची कंपनी कॉम्प्युटर मेमरी बनवण्याचे काम करते.

याचबरोबर गुरतेजने सेल्फ ड्रायविंग कारवर देखील अनेक प्रयोग केले आहे. गुरतेजचे हे कार्य बघून इलेक्ट्रिकल अन्ड इलेक्टॉनिक्स इंजिनिअर इंस्टिट्यूटने देखील त्याचा एंड्र्यू एस ग्रोव पुरस्काराने सन्मान केला आहे.

Leave a Comment