‘फास्टेस्ट वुमन’ जेसी कॉम्ब्सचा कार अपघातात मृत्यू


अमेरिकन रेसिंग कार ड्राइव्हर जेसी कॉम्ब्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ती स्वतःचाच जूना रेकॉर्ड तोडत असताना तिच्या जेट कारचा अपघात झाला. 39 वर्षीय जेसी ‘फास्टेस्ट वुमन ऑन फोर व्हील्स’ म्हणून ओळखली जाते.

जेसीने 2013 मध्ये उत्तर अमेरिका ईगल सुपरसोनिक स्पीड चॅलेंजरमध्ये 641 किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने कार चालवत 48 वर्षीय मार्कचा रेकॉर्ड तोडला होता. या रेकॉर्डबरोबरच तिला ‘फास्टेस्ट वुमन’ हा पुरस्कार मिळाला होता. 2016 मध्ये तिने 478 प्रती मील एवढ्या वेगाने वाळवंळात कार चालवत रेकॉर्ड केला होता. 2016 चा हाच रेकॉर्ड मोडत असताना तिचा अपघातात मृत्यू झाला.


‘फास्टेस्ट वुमन इन द अर्थ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किटी ओ नील यांचा रेकॉर्ड मोडणे हे जेसी कॉम्ब्सचे स्वप्न होते. किटीने 1976 मध्ये 824 किलोमीटर प्रती तास या वेगाने कार चालवत रेकॉर्ड केला होता. तिच्या चाहत्यांनी आणि टीम मेट्सनी देखील सोशल मीडियावर तिला आदरांजली वाहिली.

Leave a Comment