आसाममधल्या या कामधेनुच्या दुधासाठी लांब रांगा


आसामच्या बारपेटा या मुस्लीम बहुलभागातील कलगछियाच्या खिल्ली गावात सध्या एक गाय प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. फजर अली यांच्या घरातील या गाईचे दुध पिण्यासाठी दररोज त्यांच्या घरासमोर मोठ्या रांगा लागल्याचे दृश्य दिसत आहे. एकही वेत न झालेली ही गाय दररोज १३ लिटर दुध देतेच पण हे दूध प्यायल्याने अनेक रोग बरे होत असल्याचा अनुभव लोक घेत आहेत. फजर अली सांगतात, ही जणू कामधेनूच आहे. ही गाय सात महिन्यांची होती तेव्हाच अडीच लिटर दुध देत असे. या गाईच्या शरीराला एक प्रकारचा सुगंध आहे. या गायीचे दुध प्यायले कि पोट दुखी, पोटाचे अन्य विकार, डोकेदुखी, पॅरालायसीस असे अनेक रोग बरे झाल्याचे लोकांचे अनुभव आहेत. त्यामुळे ही गाय सर्वसामान्य नाही तर दैवी वरदान घेऊन आलेली आहे अशी लोकांच्या मनात भावना आहे.


अली म्हणाले, ही गाय एकदाही व्याली नाही तरी ती १३ लिटर दुध रोज देते. आम्ही तिला ५ लाख रुपयांत विकण्याचा निर्णय घेतला पण त्या दिवसापासून तिने चारा पाणी सोडून दिले मग आम्ही तिला विकायचे नाही असे ठरविले. या गाईच्या दुधासाठी रोज आमच्या घरासमोर रांगा लागतात. यामुळे या परिसरातील हिंदू मुस्लीम भेद संपला आहे. कारण सर्व धर्मातील लोक या गाईच्या दुधासाठी येत आहेत. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे दुध प्राशन करत असताना मनात एखादी इच्छा असेल तर तीही पूर्ण होते आहे.

Leave a Comment