अंतराळ प्रवास सर्वसामान्य पर्यटकांसाठी स्वप्नच


अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने या वर्षाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर खासगी प्रवासी पाठविण्याशी घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ अनेक कंपन्यांनी स्पेस ट्रॅव्हलची सुविधा जाहीर केली आहे मात्र सध्यातरी अंतराळ प्रवासावर अतिश्रीमंत व्यक्तींची मक्तेदारी राहील अशी चिन्हे दिसत आहेत. सर्वात कमी खर्चात अंतराळ प्रवास घडविण्याची घोषणा केलेल्या रिचर्ड ब्रेसन याच्या व्हर्जिन गेलेक्टिकने अंतराळातील ९० मिनिटांच्या प्रवासासाठी २.५ लाख डॉलर्स म्हणजे १.७२ कोटी खर्च दिला आहे. कॅनडातील एन्टरटेनमेंट कंपनी सर्क डू सोलीलचे मालक गाय लालीबर्त यांनी दोन आठवडे अंतराळात मुक्काम करण्यासाठी ३५० लाख डॉलर्स म्हणजे २१० कोटी रुपये चुकते केले असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकन स्टार्टअप बिगलो एअरस्पेसने एक माणूस अंतराळात फिरवून आणण्यासाठी ३५८ कोटी रुपये खर्च येतो असे सांगितले आहे. अंतराळ स्थानकात राहण्याचा खर्च कोट्यावधीच्या घरात असून टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी पुढच्या दशकात अंतराळ पर्यटन सुरु करत असल्याचे घोषणा केली आहे. व्हर्जिन कंपनी ६ सितार यानातून ४० हजार फुट उंचीवर जेथे अंतराळ सीमा सुरु होते तेथपर्यंत नेण्याची सुविधा देत असून त्यासाठी आत्तापर्यंत ६०० लोकांनी बुकिंग केल्याचे सांगितले जात आहे. या पैकी बहुतेक पर्यटकांचे उत्पन्न ७० कोटींहून अधिक असल्याचेही समजते.

Leave a Comment