अमेरिकेने लाँच केले स्पेस कमांड, बनवणार अंतराळ सेना


अंतराळामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेने आज अधिकृतरित्या स्पेस कमांड लाँच केले आहे. ट्रम्प सरकारद्वारे अंतराळात सैन्य (स्पेस फोर्स) बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे. युएस स्पेस फोर्स ही अमेरिकेची सहावी सैनिकी शाखा आहे, जी अंतराळात अमेरिकेचा दबदबा वाढवेल.

लाँचिंगच्या वेळेस राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. जॉन रेमंडला स्पेड कमांडचा पहिला प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अमेरिकन सैन्याने 2009 मध्ये अमेरिका सायबर कमांडची स्थापना केली होती. त्यानंतर कोणतेही कमांड बनवण्यात आले नाही. अमेरिकन स्पेस कमांड SPACECOM सैन्याची 11 वी लढाऊ युनिट आहे. प्रत्येकाकडे सैन्य अभियानासाठी एक भौगोलिक कार्यात्मक मिशन देण्यात आलेले आहे.

स्पेस कमांड लाँच केल्याने अंतराळात अमेरिकन सैन्याचे गठन आणि सुधारणांसाठी गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. मागील महिन्यातच सिनेट मार्क एस्परने म्हटले होते की, युध्द लढण्यासाठी एक ठिकाण म्हणून अंतराळाला विकसित केले पाहिजे.

SPACECOM चे मुख्य कार्यालय कोठे असेल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेले नाही. कॅलिफोर्निया अथवा कॉलोराडो येथे कार्यालय असण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हटले होते की, अमेरिकेच्या सुरक्षेची जेव्हा गोष्ट येते त्यावेळी अंतराळात अमेरिकेचे वर्चस्व असणे गरजेचे आहे.

स्पेस फोर्ससाठी दरवर्षी बजेटमध्ये 1 अब्ज डॉलर ते 2 अब्ज डॉलर अतिरिक्त खर्चाचा समावेश करावा लागणार आहे. सुरूवातीचा खर्च हा 5 अब्ज डॉलर एवढाही असू शकतो.

Leave a Comment