हा आहे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तीचा नवा सक्सेस मंत्रा


बीजिंग : तंत्रज्ञानाच्या जगात सध्या आठवड्यातून केवळ 12 तासच काम करणे क्रमप्राप्त असल्याचा नवा सक्सेस मंत्रा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले जॅक मा यांनी दिला आहे.

हे सर्वकाही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने शक्य असल्याचे जॅक मा यांनी म्हटले आहे. म्हणाले. त्याचबरोबर जॅक मा यांनी कार्यालयीन कामकाजाची वेळ घटवून केवळ 4 तास काम आणि ते सुद्धा आठवड्यातील 3 दिवस, असे सूत्र सांगितले. मनुष्याच्या कामाची वेळ माणसाचे काम कमी आणि तंत्रज्ञानाचे काम जास्त या सूत्राने कमी करता येऊ शकते असे देखील ते म्हणाले. जॅक मा यांनी यापूर्वी दिवसाचे 12 तास याप्रमाणे आठवड्याचे 6 दिवस काम असे सूत्र सांगितले होते. पण त्यांनी आता त्यामध्ये कमालीचा बदल सांगितला आहे.
चीनमधील शांघाय येथे झालेल्या आर्टिफिशल इंटेलिजन्स कॉन्फरन्सला संबोधित करताना जॅक मा यांनी कामाची नवी पद्धत सांगितली. ते म्हणाले, लोक आठवड्यातील तीन दिवस आणि ते ही दिवसातून केवळ चार तास काम तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे करु शकतात.


जॅक मा संबोधित करत होते त्यावेळी त्यांच्यासोबत मंचावर कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क देखील उपस्थित होते. शिक्षण व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे यावेळी जॅक मा यांनी सांगितले. प्रत्येक मनुष्य, देश आणि सरकारला पुढील 10-20 वर्षात शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्याला अशी शिक्षण व्यवस्था उभी करावी लागेल ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळू शकेल. एक अशी नोकरी ज्यामध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि 12 तासच काम असेल. आपण जर शिक्षण व्यवस्था बदलली नाही तर हे अशक्य असेल, असे जॅक मा म्हणाले.

आता आठवड्याला 12 तास काम जॅक मा यांनी सांगितले असले तरी त्यांनी यापूर्वी एप्रिल महिन्यात दिवसाला 12 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. केवळ 8 नव्हे तर 12 तास काम करणारी माणसे हवी असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्यानंतर चीनच्या मीडियात त्यांच्यावर टीका झाली होती.

Leave a Comment