पाक मंत्र्याचा खुळचट दावा, या महिन्यात होणार भारत-पाक युद्ध


पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये भारताबरोबर युध्द होईल, असा दावा केला आहे. रावळपिंडी येते बोलताना अहमद म्हणाले की, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची वेळ आली आहे. दोन्ही देशांमधील हे अंतिम युद्ध असेल.

ते म्हणाले की, जर संयुक्त राष्ट्राला काश्मीरचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी आता काश्मीरमध्ये जनमत घ्यावे. काश्मीरचे भविष्य आता तेथील तरूण ठरवतील. आम्ही काश्मीरच्या लोकांसोबत आहोत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना अहमद म्हणाले की, मोदींनी काश्मीर उद्धवस्त केले आहे. मोदींच्या मार्गात पाकिस्तान हा एकमेव अडथळा आहे. बाकीचे मुस्लिम राष्ट्र या मुद्यावर का शांत आहेत ? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जीना यांनी भारतातील मुस्लिमविरोधी भावना खूप आधीच ओळखले होते. चीन सारखा मित्र पाकिस्तानबरोबर उभा आहे, याचा आम्हाला आनंद आहे, असेही ते म्हणाले.

तसेच याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी भारताने शिमला करार मोडला असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment