… तर राहुल गांधी यांना जोड्याने मारतील लोक!


श्रीनगर : केंद्रातील मोदी सरकारेन जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यामधील वाकयुद्ध सुरुच आहे. आता राहुल गांधींवर काश्मीरबाबत त्यांच्या भूमिकेवरुन राज्यपाल मलिक यांनी हल्लाबोल केला आहे. पण राज्यपालांची जीभ टीका करताना घसरली आहे. राहुल गांधी जर कलम 370 चे समर्थक असतील तर लोक त्यांना जोड्याने मारतील, असे ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, देशातील प्रतिष्ठित कुटुंबातील राहुल गांधी हे आहेत, पण परंतु ते राजकीय नवशिक्याप्रमाणे वागले आहेत. संयुक्त राष्ट्राला पाकिस्तानने लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. गांधींनी हे करायला नको होते. देशात ज्यावेळी निवडणूक होईल, त्यांच्याविरोधात काही बोलण्याची गरज नाही. केवळ एवढच सांगितले की राहुल गांधी 370 चे समर्थक असतील तर लोक त्यांना जोड्याने मारतील.

ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान हिंसा भडकावण्याचे काम करत असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आधार घेतल्याचे वृत्त होते. त्यामुळे राहुल गांधींनी ट्विट केल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment