हिजाबला विरोध करणाऱ्या महिलेला 24 वर्षांची शिक्षा


इराणच्या न्यायालयाने हिजाब घालणे बंधनकारक नसावे असे अभियान चालवणाऱ्या मुलीला 24 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हिजाबच्या विरोधात ‘व्हाइट वेन्सडे’ हे कॅम्पेन चालवणाऱ्या 20 वर्षीय अफसरीला तेहरानच्या रिवोल्यूशनरी न्यायालयाद्वारे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे जगभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

शिक्षा सुनावत न्यायाधीशांनी सांगितले की, महिलांना हिजाब काढून देशात भ्रष्टाचार आणि वेश्यावृत्तीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे 24 मधील 15 वर्षांची शिक्षा या दोन गुन्ह्यांसाठी देण्यात येत आहे.

अफसरी आणि तिची आई राहीला अहमदी इराणमधील ‘व्हाइट वेन्सडे’ या कॅम्पेनच्या प्रमुख आहेत. अफसरीला या आधी ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा तिला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

काय आहे ‘व्हाइट वेन्सडे’ कॅम्पेन ?

इराणमध्ये हिजाब विरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन चालवले जात आहे. ज्यामध्ये महिलांना विना हिजाब परिधान केलेले फोटो शेअर करण्यास सांगितले जात आहे. या कॅम्पेनला महिला सशक्तीकरणाचा भाग असल्याचे ते समजतात. कॅम्पेनच्या पहिल्या दोन आठवड्यात 200 व्हिडीओ पोस्ट करण्यात आले व ते व्हिडीओ 5 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले.

यानंतर तेहरानच्या रिवोल्यूशनरी न्यायालयाने असे करणाऱ्या महिलांना 1 ते 10 वर्षांची शिक्षा देण्यात येईल असे सांगितले. तेव्हा पासून अनेक महिलांना जेलमध्ये देखील टाकण्यात आले आहे. याच आठवड्यात 12 महिलांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment