जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक लवकरच एक नवीन मोबाईल अॅप लाँच करणार आहे. फेसबुकचे हे नवीन अॅप स्नॅपचॅटला टक्कर देणार आहे. रिपोर्ट्सनुसार, फेसबुकचे हे नवे अॅप थ्रेड्स (Threads) नावाने ओळखले जाईल. हे अॅप सुरूवातीला इंस्टाग्रामबरोबर सुरू केले जाऊ शकते.
स्नॅपचॅटला टक्कर देणार फेसबुकचे हे नवे अॅप
थ्रेड अॅपद्वारे इंस्टाग्राम युजर्स आपल्या क्लोज फ्रेंड्संना लाइव लोकेशन, गाडीचा स्पीड आणि बॅटरी लाइफ शेअर करू शकणार आहेत. तसेच, यासाठी ते आपल्या मित्रांना इनवाइट देखील करू शकणार आहेत.
सध्या फेसबुक या अॅपचे टेस्टिंग करत असून, सुरूवातीला याचा वापर केवळ इंस्टाग्रामवरील क्लोज फ्रेंड या पर्यायासाठी केला जाणार आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही क्लोज फ्रेंडची लिस्ट बनवू शकता व त्यांना आपली पर्सनल माहिती या अॅपद्वारे शेअर करू शकाल. हे अॅप कधीपर्यंत लाँच करण्यात येणार आहे, या बाबतची अधिकृत माहिती अद्याप फेसबुककडून देण्यात आलेली नाही.