17 हॉटेल्सचा भारतीय मालक निघाला सुटकेस चोर


अमेरिकेच्या मेंफिस विमानतळावरून सुटकेस चोरी करण्याच्या आरोपाखाली मूळ भारतीय उद्योगपती आणि 17 हॉटेल्सचे मालक दिनेश चावलाला पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांनी सांगितले की, चावला यांचे मिसिसिपी येथे 17 हॉटेल्स आहेत. त्यांनी 18 ऑगस्टला विमानतळावरून एक बॅग चोरी करून आपल्या गाडीत ठेवली होती. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर, सुटकेस जप्त करण्यात आली.

या सुटकेसची आणि त्यातील सामानांची किंमत 4000 डॉलर (2.85 लाख रूपये) होती. चौकशीमध्ये चावला यांनी चोरी केल्याचे मान्य केले. त्यांनी याआधी देखील चोरी केली असल्याचे मान्य केले. सध्या ते 5 हजार डॉलर भरून जामीनावर बाहेर आहेत. चौकशी दरम्यान चावला यांनी सांगितले की, त्यांना माहित आहे चोरी करणे चुकीचे आहे. मात्र ते सहज संस्पेंस आणि आनंद घेण्यासाठी असे करतात.

दिनेश चावला हे अनेक हॉटेल्सचे मालक आहेत. क्वीवलँडमध्ये त्यांचे आणखी एक हॉटेल तयार होत आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरने फेब्रुवारीमध्ये त्यांच्याबरोबरील व्यवसायातून वेगळे झाले. ट्रम्प आणि चावला 1988 पासून एकमेकांना ओळखतात. त्यावेळी दिनेश चावला यांचे वडिल वीके चावलाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ग्रीनवूडमध्ये एक मोटल सुरू करण्यासाठी मदत मागितली होती.

Leave a Comment