सर्बियन अभिनेत्री नताशाने घेतली हार्दिक पंड्याची विकेट


रँपवॉकवर मिरवून चर्चेत आलेल्या अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा हळू पावलांनी प्रेमाचा प्रवेश झाला आहे. स्पॉटबॉयच्या बातमीनुसार सध्या हार्दिकची सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच बरोबर जरा जास्त जवळीक निर्माण झाली असून नताशाने हार्दिकची विकेट काढल्याची चर्चा जोरात आहे. अर्थात नताशाने हार्दिकची विकेट क्रिकेट पीचवर नाही तर प्रेमाच्या पिचवर काढली आहे. हार्दिक सध्या नताशाला डेट करतो आहे आणि मुंबईतील बांद्रा येथे दोस्तानी दिलेल्या पार्टीला तो नताशासह हजर होता.

हार्दिक या नव्या गर्लफ्रेंड बाबत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्याने त्याच्या कुटुंबियांशी नताशाची ओळख करून दिली आहे. दोस्तानी दिलेल्या पार्टीत हार्दिकसोबत त्याचा भाऊ कुणाल, वहिनी पंखुडी आणि नताशा आले तेव्हा हार्दिकने नताशाची ओळख मैत्रीण अशी करून दिली.

नताशा नच बलिये ९ कार्यक्रमात सहभागी आहे. तीन वर्षाची असल्यापासून ती नृत्य शिकते आहे. ती मुळची सर्बियाची असून २०१० मध्ये तिने स्पोर्ट्स सर्बिया खिताब जिंकल्यावर स्पोर्ट्स मध्येच करियर करण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment